या जगातील सर्वच घटना विधिलिखित आहेत काय?


बरेच लोक मला विचारतात कि आपला मृत्यू हा विधिलिखित आहे काय? या जगातील सर्वच घटना या विधिलिखित आहेत काय? आत्मा आहे काय? आपले वर्तमान जीवन हे आपल्या मागच्या जन्मातील कर्मांचे फळ आहे काय? जर असे असेल तर आपण प्रयत्न का करायचे? लोकांना दोष का द्यायचा? सगळे देवावरती आणि कर्मावरतीच सोडून द्यायला पाहिजे ना . याचे उत्तर बऱ्याच अंशी नाही असे आहे.आपला जन्म जरी ठरला असला तरी आपला मृत्य हा ठरलेला नाही आहे. यावरून माझे बऱ्याच लोकांशी मतभेद होतात. पहिल्यांदा देव म्हणजे काय हे समजून घ्या.जर तुम्ही म्हणाल कि या जगावरती एकाच ईश्वराचे राज्य आहे तर मी म्हणेन कि तुम्हाला देव म्हणजे काय हे समजलेच नाही. कायम लक्षात असू द्या कि या जगावरती तीन वेगवेगळ्या शक्ती राज्य करतात.पहिली शक्ती म्हणजे परमात्मा,दुसरी शक्ती हि पदार्थ आणि शरीर आणि तिसरी शक्ती म्हणजे काळ होय.हे सर्व नाशवंत आहे म्हणजे यांचा एक दिवस अंत ठरलेला आहे. शरीर आणि पदार्थविना आत्म्याचे काहीच अस्तित्व नाही आणि आत्मा नसेल तर शरीर हे पार्थिव आहे. इथे शरीर म्हणजे या अफाट विश्वाचे शरीर होय. शरीराविना आत्मा हा भरकटलेला असतो. जेव्हा सगळे संपते तेव्हा एक निर्वात पोकळी आणि तिचा अंकुर फक्त शिल्लक राहतो आणि यात ऊर्जा सामावलेली असते.हि ऊर्जा सजीव असते.लक्षात ठेवा कि ऊर्जा कधीच नष्ट होत नाही.सगळीकडे अंधार पसरलेला असतो परंतू या अंधाराच्या आत एक विलक्षण तेजस्वी अंकुर लपलेला असतो आणि नंतर त्यातून विश्वनिर्मिती होते.त्यामुळे तुम्हा आम्ह्लाला या विश्वाच्या अंताची काळजी करायची गरज नाही.
आपल्या शरीरात आत्मा नाही परंतू जीव आहे. या विश्वाचा आत्मा एकच आहे तो म्हणजे विश्वात्मा किंवा परमात्मा.जीव हा परम्यात्माचाच एक भाग आहे. जीव गेला म्हणजे शरीर काम करणे बंद करते परंतू कर्म हे विश्वात्म्याजवळ जाते.जेव्हा जीव शरीर सोडतो तेव्हा या जीवासोबत कर्म चिकटले असते ज्याप्रमाणे एखाद्या साखरेच्या पाकावरती मुंग्या चिकटल्या असतात. जर जीवाला परम्यात्माच्या भेटीची ओढच नसेल तर हा जीव मध्येच कुठेतरी लटकतो आणि शरीर नसल्यामुळे प्रचंड वेदना सहन करतो. लक्षात घ्या जर जीवाला परम्यात्म्याच्या भेटीची ओढ नसेल तर परमात्मा हि त्याला यायची जबरदस्ती करत नाही. हे म्हणजे कसे झाले आपण एखादी चूक केली तर आपल्या शिक्षकाला किंवा वडिलांना उत्तर द्यायची भिती बाळगून इकडे तिकडे भटकत राहणे.
तुमच्या जीवावरती तुमचे सोडून कोणाचेही नियंत्रण नाही आहे.यमदेव वगैरे या भ्रामक कल्पना आहेत. तुमची जर खरोखर परम्यात्म्याकडे जायची इच्छा असेल तर तो तुम्हाला रस्ता दाखवितो.
इथे एक लक्षात घ्या मुळात तुमचा जीव हा मोहामुळे त्या परमात्यापसून दूर गेला आहे आणि तो पीडा भोगतो आहे त्यामुळे तो परमात्मा तुमचा फारसा विचार करत नाही. परंतू तुम्ही जर देवावरती विश्वास ठेवलात आणि देवाला जर घाबरत असाल किंवा आदर करत असाल तर त्याचे तुमच्याकडे लक्ष वेधले जाते. तुम्हाला जर जास्तच उन्माद आला असेल तरीपण तो तुम्हाला अद्दल घडवितो.तुम्ही जर देवाला घाबरत नसाल तर तुमचे वागणे बेभान होते.मग काळाचे तुमच्याकडे लक्ष वेधले जाते. काही जीवांना काही खास कामासाठी त्या परमात्य्म्याने पाठविले असते. त्यांना काळ आणि वेळही साथ देते म्हणून या ठिकाणी एखाद्या माणसाला देव समजणे चूक आहे.
जन्म देणे हे परम्यात्माच्या हातात आहे परंतू मृत्यू हा काळ ठरवितो आणि तो विधिलिखित नाही आहे. शरीर आणि भौतिक वस्तुंना हि एक दिवस काळ संपवितो आणि काळहि एक दिवस संपतो.जर तुम्ही एखाद्या जीवाला(मनुष्याला) विनाकारण त्रास दिलात आणि जर का तो जीव फार तळमळला तर प्रत्यक्ष परमात्मा काळाची मदत घेतो आणि तुम्हाला संपविण्याची योजना आखतो मग तो काही कारण आणि कोणतीही पूर्वसूचना नसताना आलेला हृदयाचा झटका असेल किंवा डोळ्याची पापणी लवेपर्यंत झालेला अपघात असेल.
जर तुम्ही मांस खाण्यासाठी एखाद्या जीवाची हत्या केलीत तर ते तुम्हाला माफ आहे कारण प्राचीन काळापासून मनुष्य हा या प्राण्यांवरती जगला आहे आणि या प्राण्यांच्या व्यापारातून अनेक सभ्यता घडल्या आहेत.आता मला सांगा वाळवंटात मनुष्य मांस न खाता कसा काय जगणार? तसेच मांस हे बकरीचे खाल्ले काय आणि गाईचे खाल्ले काय दोन्हींही उपयुक्त पशूच आहेत.आपली प्राचीन काळापासून कृषिप्रधान संस्कृती आहे. त्यामुळे आपल्याकडे गोवंशाचे मांस खाल्यामुळे शेतकरी धोक्यात आला होता म्हणून गोवंश हत्येवरती बंदी आली आहे . तसेच वाळवंटी प्रदेशात डुक्करच मिळत नाहीत म्हणून मुस्लिमांना डुकराचे मांस निषिद्ध आहे. त्यांना परत धार्मिक कारणे जोडली हा वेगळा भाग आहे.
आता बऱ्याच निर्व्यसनी लोकांना सुद्धा कर्करोग होतोच ना आणि मांस न खाणाऱ्या लोकांना पण हृदयाचा झटका कमी वयात येतोच ना? इथे लक्षात घ्या कि तुम्ही जर दररोज मेंढीचे मटण खाल्ले ,रोज सिगारेटचे एक पॅकेट संपविले,खाण्यापिण्यावरती लक्ष नाही दिले,व्यायाम नाही केला तर हृद्यासंबंधीआणि पचनसंस्थेसंबंधी रोग हे होणारच. त्यामुळे आत्मभान आणि स्वाभिमान राखणे फार गरजेचे आहे.
आपले जीवन घडविणे हे बऱ्याच अंशी आपल्या हातात आहे परंतू काही गोष्टी या देवाने त्याच्या हातात ठेवल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेस मेहनत करूनही हाता तोंडाशी आलेला घास निघून जातो.
तुमचे मागच्या जीवनातील कर्म जरी फार वाईट असेल तरीपण या जीवनात जर तुम्ही काही चांगले केले ,आत्मभान ठेवले तर तुमच्या आयुष्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी घडू शकतात.
एखादी वाईट गोष्ट करून जर तुम्हाला त्याचे काहीच प्रायश्चित्त होत नसेल तर काळच तुमच्या विनाशाची योजना आखायला सुरुवात करतो.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आयोद्धेत रामाचे कोणीच वंशज का नाही वास्तव्य करत आहे?

रामायणाचा काळ आणि मंदिराचे पुरावे(संदर्भ:हे शिल्प आठव्या शतकातील वेरुळ लेण्यातील आहे)