या जगातील सर्वच घटना विधिलिखित आहेत काय?
बरेच लोक मला विचारतात कि आपला मृत्यू हा विधिलिखित आहे काय? या जगातील सर्वच घटना या विधिलिखित आहेत काय? आत्मा आहे काय? आपले वर्तमान जीवन हे आपल्या मागच्या जन्मातील कर्मांचे फळ आहे काय? जर असे असेल तर आपण प्रयत्न का करायचे? लोकांना दोष का द्यायचा? सगळे देवावरती आणि कर्मावरतीच सोडून द्यायला पाहिजे ना . याचे उत्तर बऱ्याच अंशी नाही असे आहे.आपला जन्म जरी ठरला असला तरी आपला मृत्य हा ठरलेला नाही आहे. यावरून माझे बऱ्याच लोकांशी मतभेद होतात. पहिल्यांदा देव म्हणजे काय हे समजून घ्या.जर तुम्ही म्हणाल कि या जगावरती एकाच ईश्वराचे राज्य आहे तर मी म्हणेन कि तुम्हाला देव म्हणजे काय हे समजलेच नाही. कायम लक्षात असू द्या कि या जगावरती तीन वेगवेगळ्या शक्ती राज्य करतात.पहिली शक्ती म्हणजे परमात्मा,दुसरी शक्ती हि पदार्थ आणि शरीर आणि तिसरी शक्ती म्हणजे काळ होय.हे सर्व नाशवंत आहे म्हणजे यांचा एक दिवस अंत ठरलेला आहे. शरीर आणि पदार्थविना आत्म्याचे काहीच अस्तित्व नाही आणि आत्मा नसेल तर शरीर हे पार्थिव आहे. इथे शरीर म्हणजे या अफाट विश्वाचे शरीर होय. शरीराविना आत्मा हा भरकटलेला असतो. जेव्हा सगळे संपते तेव्हा एक निर...